Authors

  • कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील महावितरण (MSEDCL) मधील कंत्राटी कामगारांचा सामाजिक व आर्थिक स्थितीचा अभ्यास Author
  • कु. विश्रांती जांबीवंत चव्हाण Author
  • प्रो. डॉ. मधुरा बाबासाहेब देसाई Author

Keywords:

सामाजिक सुरक्षितता, कंत्राटी कामगार, प्रशासनाच्या सोयी, वेतन-भत्ते, व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य

Abstract

आजच्या जलदगतीने विकसित होत असलेल्या औद्योगिक व सेवा क्षेत्रात वीजपुरवठा ही मूलभूत गरज बनली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ही ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अखंड वीजपुरवठा करण्यासाठी कार्यरत असलेली प्रमुख शासकीय संस्था आहे. या संस्थेच्या दैनंदिन कामकाजात कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कामगारांचे योगदान मोलाचे आहे. विद्युत वाहिन्यांची देखभाल, मीटर तपासणी, तांत्रिक बिघाड दुरुस्ती, बिल वितरण इत्यादी अनेक जबाबदाऱ्या हे कामगार पार पाडत असतात. मात्र कंत्राटी पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांची सामाजिक व आर्थिक सुरक्षितता मात्र अपेक्षेइतकी स्थिर नसते. अनियमित रोजगार, मर्यादित वेतन, सुरक्षिततेची कमी साधने, आरोग्यविमा किंवा सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव, दीर्घ कामाचे तास आणि कामातील जोखीम यामुळे त्यांच्या जीवनमानावर थेट परिणाम होतो. कुटुंबाच्या आर्थिक नियोजनापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत व सामाजिक प्रतिष्ठेपर्यंत अनेक समस्या त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनतात. विशेषतः कोल्हापूर जिल्हा हा भौगोलिक व औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने येथे विद्युत वितरणाचे प्रमाण आणि कामाचा व्याप मोठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक ठरते. या अभ्यासातून त्यांच्या जीवनमानाचे वास्तव समोर येईल तसेच सरकार, महावितरण व समाज या तिन्ही पातळ्यांवर सुधारणा करण्यासाठी योग्य सूचना देणे शक्य होईल. कंत्राटी कामगारांचे प्रश्न समजून घेताना त्यांच्या कार्यपरिस्थितीचा अभ्यास, वेतनव्यवस्था, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य सुविधा, कामातील धोके, रोजगाराचे सातत्य, तसेच त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानाचा सखोल विचार करणे आवश्यक आहे प्रस्तुत संशोधनामध्ये वास्तव उलगडून दाखवण्यासोबतच भविष्यातील सुधारणा व धोरणांना दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने कंत्राटी कामगारांच्या हक्काचे संरक्षण, सुरक्षित कार्यपद्धती आणि स्थिर आर्थिक जीवन घडवण्यास मदत होईल.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील महावितरण (MSEDCL) मधील कंत्राटी कामगारांचा सामाजिक व आर्थिक स्थितीचा अभ्यास

    संशोधक विद्यार्थी, शिवाजी विदयापीठ कोल्हापूर

  • कु. विश्रांती जांबीवंत चव्हाण

    संशोधक मार्गदर्शक, राजश्री छत्रपती शाहू कॉलेज,कोल्हापूर

  • प्रो. डॉ. मधुरा बाबासाहेब देसाई

Published

2025-12-20

How to Cite

(2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 1137-1146. https://iipublications.com/iipwjhss/article/view/978

Similar Articles

1-10 of 235

You may also start an advanced similarity search for this article.