सोलापूर जिल्ह्यातील मांग समाजाची आर्थिक स्थिती
Keywords:
सोलापूर मांग समाजAbstract
कोणत्याही समाजाचा विकास आणि प्रगती ही त्या समाजाच्या आर्थिक विकासावरून निश्चिती केली जाते. म्हणजेच कोणत्याही समाजाचा विकास आणि प्रगतीचे मापक म्हणजे आर्थिक विकास होय. हा आर्थिक विकास ही त्या समाजाच्या मालकीचे असणारे व्यवसाय त्या व्यवसायाची त्याची समाजातील मागणी आणि त्यापासून एकक म्हणून आपण कुटुंबाचा विचार करीत असल्यामुळे वरील सर्व बाबी कोणत्याही समाजातील कुटुंबाला लागू पडतात. म्हणजेच कुटुंबाचा असलेला व्यवसाय आणि त्या कुटुंबाचे सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने महत्त्व व त्यापासून मिळणारा आर्थिक मोबदला या बाबीत त्या कुटुंबाचे उत्पन्न ठरवतात व जसजसे कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडत जाईल. तसतसे कुटुंबात वास्तविक करणाऱ्या सदस्यांच्या एकूण जीवनत प्रगती होत असते. प्रगतीची ही वाढ कुटुंबातील कमवत्या सदस्याची संख्या त्यांच्यावर अवलंबून असणारी संख्या काम करण्यासाठी सदस्य जवळ असलेली योग्यता व सदस्याचे आरोग्य यावरही अवलंबून असते. हे खरे असले तर कुटुंबाची प्रगती ही बऱ्याच प्रमाणात आर्थिक घटकावर अवलंबून असते. म्हणजेच कौटुंबिक विकासात आर्थिक घटकाचे अन्य साधारण महत्त्वाचे योगदान आहे .वरील सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मागासलेल्या जाती समूहातील व्यावसायिक प्रतिकूलता सामाजिक अप्रतिष्ठा सामाजिक महत्त्व व त्यापासून नग्न मिळणारा मोबदला यामुळे मागासलेल्या जाती समूहातील कौटुंबिक मिळकतीचा स्रोतच मुळात जगण्यापुरता असतो. यामुळे या जातीसमूहातील संपूर्ण जीवनमानाचा स्तर भिन्न प्रकारचा दिसून येतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अध्ययनातील मागासलेली जात म्हणून त्यांच्या कौटुंबिक मासिक उत्पन्नाचा आढावा घेण्यात आला.