भारतीय राष्ट्रीय आंदोलन आणि गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम
##semicolon##
महात्मा गांधी##common.commaListSeparator## रचनात्मक कार्यक्रम##common.commaListSeparator## स्वराज्य##common.commaListSeparator## आत्मनिर्भरता##common.commaListSeparator## भारतीय राष्ट्रीय आंदोलन##common.commaListSeparator## अहिंसक क्रांती##common.commaListSeparator## सामाजिक सुधारणा##common.commaListSeparator## खादी आणि चरखा##article.abstract##
प्रस्तुत शोधनिबंधामध्ये महात्मा गांधींच्या रचनात्मक कार्यक्रमा चे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व आणि प्रभाव यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. गांधीजींच्या मते, स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिशांकडून राजकीय सत्ता मिळवणे नसून, ते तळागाळातील भारतीय समाजाचे सामाजिक आणि आर्थिक पुनरुत्थान करणे होते. या शोधनिबंधात खादी, अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुस्लिम एकता, शिक्षण (नई तालीम) आणि ग्रामीण स्वच्छता यांसारख्या रचनात्मक कार्यांमुळे भारतीयांमध्ये कशा प्रकारे राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली, याचे विश्लेषण केले आहे. राजकीय चळवळी शांत असतानाच्या काळात या कार्यक्रमांनी जनतेला मानसिक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय ठेवण्याचे कार्य केले. निष्कर्षात असे स्पष्ट होते की, गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम हे केवळ समाजसुधारणेचे कार्य नसून, ते खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया होते.