भारतीय श्रमबाजारातील असंघटित क्षेत्र : वर्तमान स्थिती आणि भवितव्य
Keywords:
नारी जीवन, हिंदी उपन्यास, स्त्री चेतना, सामाजिक परिवर्तन, आत्मनिर्भरता, अस्मिता आदि।Abstract
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये श्रम बाजाराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. उत्पादन, सेवा, कृषी, उद्योग व पायाभूत सुविधांच्या उभारणीत श्रमशक्तीचा मोलाचा वाटा जाणवते. त्यामुळे असंघटित क्षेत्र हे भारतीय श्रम बाजाराचा केवळ पूरक नसून त्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे कामगारांची औपचारिक नोंदणी नसते, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आणि सामाजिक सुरक्षा लाभ अत्यल्प किंवा अनुपलब्ध असतात. कृषी व संलग्न व्यवसाय, बांधकाम, लघुउद्योग, कुटीर उद्योग, वाहतूक, फेरीविक्री, घरगुती कामगार, सेवा क्षेत्रातील तात्पुरते रोजगार या सर्वांचा समावेश असंघटित क्षेत्रात होतो. या क्षेत्रातील कामगारांचे रोजगार स्वरूप बहुधा हंगामी, तात्पुरते किंवा दैनंदिन मजुरीवर आधारित असतात. उत्पन्नातील अनिश्चितता, रोजगाराची अस्थिरता आणि सामाजिक असुरक्षितता ही या क्षेत्राची ठळक वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जाणारा श्रम बाजार आजही प्रामुख्याने असंघटित क्षेत्रावर अवलंबून आहे. एकूण रोजगाराच्या सुमारे ८५-९० टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात आहेत. कमी वेतन, रोजगाराची अस्थिरता, सामाजिक सुरक्षा अभाव, कामगार हक्कांचे उल्लंघन आणि कौशल्य विकासाच्या मर्यादा ही या क्षेत्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये भारतीय श्रम बाजारातील असंघटित क्षेत्राचे स्वरूप व व्याप्ती, असंघटित क्षेत्राच्या वर्चस्वामागील सामाजिक-आर्थिक कारणे, असंघटित क्षेत्राचे कामगारांच्या जीवनमानावर होणारे परिणाम, शासकीय धोरणे व योजनांची परिणामकारकता यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.