जागतिक राजकारणातील भारत: धोरण, प्रभाव आणि भविष्यातील दिशा

Authors

  • प्रा.ॲड.प्रियांका विलास झोळे पाटील Author

Keywords:

जागतिक राजकारण धोरण परराष्ट्र धोरण

Abstract

भारत हा प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला आणि आधुनिक लोकशाही मूल्यांवर आधारित राष्ट्र असून, स्वातंत्र्यानंतर त्याने जागतिक राजकारणात आपली स्वतंत्र, स्वायत्त आणि जबाबदार भूमिका निर्माण केली आहे. प्रस्तुत शोधनिबंधात “जागतिक राजकारणातील भारत: धोरण, प्रभाव आणि भविष्यातील दिशा” या विषयाच्या अनुषंगाने भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्यानंतरचे परराष्ट्र धोरण, अलिप्तता चळवळ,आर्थिक व सामरिक धोरणांचा जागतिक प्रभाव, क्षेत्रीय राजकारणातील भूमिका, तसेच जागतिक संस्थांमधील सहभाग यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आलेला आहे.भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया शांतता, सहअस्तित्व, सार्वभौमत्व, मानवता आणि स्वायत्त निर्णयक्षमता या तत्त्वांवर आधारित असून, शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततेचे धोरण, १९९१ नंतरचे आर्थिक उदारीकरण, अणुशक्ती आणि बहुपक्षीय जागतिक सहभाग यांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक प्रभावी झाली आहे. २१व्या शतकात भारत G-20, ब्रिक्स, क्वॉड, संयुक्त राष्ट्रे यांसारख्या जागतिक मंचांवर सक्रिय योगदान देत आहे. या शोधनिबंधाचा उद्देश भारताच्या जागतिक राजकारणातील भूमिकेचा ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक व सामरिक दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याच्या भविष्यातील धोरणात्मक दिशांचे विश्लेषण करणे हा आहे. सद्य अभ्यासातून असे स्पष्ट होते की भारत भविष्यात जागतिक शांतता, विकास, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सुरक्षा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण नेतृत्वकारी भूमिका निभावू शकतो.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा.ॲड.प्रियांका विलास झोळे पाटील

    यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,इस्लामपूर

Published

2025-12-20

How to Cite

जागतिक राजकारणातील भारत: धोरण, प्रभाव आणि भविष्यातील दिशा. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 258-265. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1147

Similar Articles

1-10 of 230

You may also start an advanced similarity search for this article.