प्राचीन संस्कृत नायिकेपासून आधुनिक स्त्रीपर्यंत परिवर्तनाचा प्रवास
Keywords:
प्राचीन संस्कृत आधुनिक स्त्रीAbstract
कोणत्याही भाषेचा आत्मा हा त्या भाषेचे साहित्य असते. साहित्य म्हटले की त्यामध्ये विविध प्रकार आढळून येतात जसे की कथा, कादंबरी, नाटक काही महत्त्वाचे ग्रंथ संस्कृत भाषेच्या साहित्याचा विचार केला तर त्यामधील प्राचीन कवींनी, नाटककारांनी लिहिलेली महाकाव्ये, नाटके, विविध ग्रंथ इत्यादी गोष्टी सामावलेल्या आहेत. आणि या साहित्याला योग्य दिशा देणारे पात्र म्हणजेच त्या त्या साहित्यातील "नायिका". प्राचीन संस्कृत नायिका या भारतीय समाजातील एक आदर्श प्रतिमाच ठरताना दिसून येतात. आणि याच प्रतिमेचा आधार घेऊन आधुनिक काळातील स्त्री ही सक्षम झालेली दिसते. प्राचीन संस्कृत नायिका आणि आधुनिक स्त्री यांचे रूप जरी वेगवेगळे असले तरी ती आजची एक आदर्श भारतीय स्त्री ठरलेली दिसून येते. काळानुसार समाजव्यवस्थेमध्ये बदल झाले. आणि एका आत्मविश्वासपूर्ण स्त्रीचे बदलते रूप आपल्या प्रत्ययास येते.आणि यामधून स्त्रीच्या परिवर्तनाचा प्रवास घडून येतो.