आंबेडकर आणि ग्राम्शी यांच्या मुक्तीवादी विचारांचा तुलनात्मक अभ्यास
##semicolon##
जातिव्यवस्था##common.commaListSeparator## वर्चस्व##common.commaListSeparator## सांस्कृतिक प्रभुत्त्व##common.commaListSeparator## सेंद्रिय बुद्धिवंत##common.commaListSeparator## दलित##common.commaListSeparator## सबाल्टर्न##common.commaListSeparator## वंचित##article.abstract##
वंचित समुदायाचे विचारवंत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अंतोनिओ ग्राम्शी हे वैश्विक पातळीवर महत्त्वाचे आहेत. या दोन्ही विचारवंतांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा उद्देश त्यांच्या संबंधित अनुभवांना, वैयक्तिक इतिहासाला व शोषित कर्तृत्त्वाच्या जडणघडणीविषयाच्या त्यांच्या सैद्धांतिक मांडणीला समजून घेण्यासाठी त्यांना एकाच पातळीवर आणणे हा आहे. अनुभवाच्या व वैचारिक पातळीवर बघता आंबेडकर आणि ग्राम्शी यांच्यात अनेक साम्यस्थळे आढळून येतात. त्यांचे विचार हे त्यांनी प्रत्यक्ष जगलेल्या अनुभवातून आणि कार्य करण्यात व्यतीत केलेल्या सक्रीय जीवनातून उगम पावतात. या दोन्ही विचारवंतांच्या विचारांमध्ये प्रामाणिकता आणि ध्येयाप्रतीची निष्ठा दिसून येते. या दोन्ही विचारवंतानी शोषणाची व्यवस्था, जातीय व सांस्कृतिक प्रभुत्त्व, धर्मव्यवस्था, शिक्षणाचे महत्त्व, बुद्धीजीवींची भूमिका व सामाजिक चळवळ आणि नागरी समाज याद्वारे मांडलेले विचार दलित व सबाल्टर्न वर्गाची स्थिती दर्शवणारे असून त्याद्वारे जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दोन्ही विचारवंतांना त्यांच्या त्यांच्या ऐतिहासिक संघर्षाच्या जात आणि वर्गाच्या पार्श्वभूमीवर बघितले असून तशी मांडणी केली आहे. हा शोधनिबंध जातिव्यवस्थेतून आणि सांस्कृतिक प्रभूत्त्वातून मुक्ततेसाठी आंबेडकर आणी ग्राम्शी यांनी सुचवलेल्या उपायांचा वेध घेतो.