Authors

  • डॉ. चिंदे एम. डी. Author

Keywords:

शैक्षणिक विकास शिवाजी कॉलेज

Abstract

आधुनिक महाराष्ट्राच्या गौरवशाली जडणघडणीच्या ज्ञानपरंपरेत अनेक संस्था व व्यक्ती यांनी आपापल्या परीने सर्वतोपरी योगदान दिलेले आहे. सुधारणावादी, पुरोगामी, महाराष्ट्राच्या या जडणघडणीच्या परंपरेत ‘रयत शिक्षण संस्था’ आणि रयत संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो. महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील, गोर गरिबांच्या मुलांनी शिकावे, त्यांचा संसार सुखाचा व्हावा याकरिता अहोरात्र कष्ट करून, महाराष्ट्रभर अनवाणी फिरून सर्वसामान्यांच्या, उपेक्षित, बहुजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी शिक्षण भगीरथ, थोर महात्मा, शिक्षणाचा किमयागार दिव्यमूर्ती, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन १९१९ मध्ये ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन १९४७ मध्ये स्थापन केलेले छत्रपती शिवाजी कॉलेज हे संस्थेचे पहिले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला खूप मोठी शैक्षणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. या महाविद्यालयाने आपल्या स्थापनेपासूनच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती साध्य करत सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या कार्याचा ‘वटवृक्ष’ निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे. याचाच या संशोधन पेपरमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. चिंदे एम. डी.

    सहायक प्राध्यापक, इतिहास विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा घटक महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा .

Published

2025-12-20

How to Cite

(2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 673-679. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1054

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.