महाभारतातील व्यक्तिरेखांची इरावती कर्वे यांनी केलेल्या मांडणीची चिकित्सा
Keywords:
इरावती कर्वे महाभारतAbstract
महाभारतातील सर्व स्त्री पात्रांना समोर आणले तरी एका विशिष्ट चाकोरीतून पलीकडे बघण्याची मानसिकता समाजाची कधीही येणार नाही आणि तशी हिम्मतही होणार नाही. फार तर काय इरावती कर्वे यांनी मांडलेल्या युगांत मध्ये एक एक स्त्री पात्रांची व्यथा त्यांच्या साम्यानुभावातून समजून घेता येईल. इरावती कर्वे या देखील जी.ए.कुलकर्णी यांनी उभ्या केलेल्या नियतीवादाचा बळी कसा एक एक मनुष्य ठरतो हे आपल्या कथेतून दाखवतात त्याप्रमाणे महाभारताची कथा ही देखील अशाप्रकारची बाब ठसविण्याचे तर काम करत नाही नाही अशी शंका घेतात त्यांच्याच शब्दात (कर्वे इरावती, २००६, पृ. १,२) “मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते”. कर्वे यांना वाटते तरीही त्या त्या व्यक्तीचा संघर्ष व्यथा ही आपली व्यथा होऊन जाते. इरावती कर्वे या समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पण मानसशास्त्रीय विश्लेषण पद्धती वापरून एक एक पात्रांच्या व्यथा आणि मर्यादा आपल्या समोर उघड करतात. त्यांची मांडणी ही पूर्णपणे नवीन असली तरी मार्क्सवादी आणि अन्य प्रवाह यांच्याकडून नंतरच्या काळात वेगळ्या पद्धतीने महाभारताकडे बघण्यात आले आहे.
Downloads
References
कर्वे इरावती, युगान्त, देशमुख आणि कंपनी प्रा.लि., पुणे, २००६ साळुंखे आ.ह., महाभारतातील स्त्रिया भाग-२ , लोकायत प्रकाशन,सातारा, पुनर्मुद्रण २०२० देवी गणेश, महाभारत महाकाव्य आणि राष्ट्र, पद्मगंधा प्रकाशन,मुंबई, २०२२ साळुंखे आ.ह., हिंदू संस्कृती आणि स्त्री, लोकवाङ्मय गृह, मुंबई,२०१७ उपिंदर सिंह, प्राचीन एवं पूर्व मध्यकालीन भारत का इतिहास पाषाण काल से १२ वी शताब्दी तक, पियर्सन इंडिया एज्युकेशन सर्विसेज प्रा.लि. दिल्ली, २०२३