भारतीय राजकीय विचारवंत आणि सामाजिक परिवर्तन एक विश्लेषणात्मक अभ्यास
Keywords:
सामाजिक परिवर्तन राजकीयAbstract
भारताला राजकीय विचारवंतांची मोठी परंपरा लाभलेली आहे भारताच्या भूमीला नवरत्नांची खान म्हणून ओळखले जाते. ते याच राजकीय विचारवंतांच्या कार्यामुळे हे विचारवंत केवळ सत्ता आणि राजकारण याबद्दल बोलले नाहीत तर त्यांनी समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश काळात भारतीय राजकीय विचारवंतांनी आधुनिक भारताच्या विचारधारेचा पाया रचला त्यामध्ये सामाजिक न्याय लोकशाही शिक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेवर भर दिला गेला. तर काही विचारवंतांनी ब्रिटिश धोरणांना आवाहन देत शोषणाविरुद्ध आवाज उठवत वसाहतवादाला विरोध केला आणि भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण वैचारिक दिशा दिली. ब्रिटिश काळात या विचारवंतांनी केवळ ब्रिटिश राजवटीला विरोध केला नाही तर त्यांनी भारताच्या भविष्यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष सामाजिक समानता आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित एक मजबूत वैचारिक पाया रचला की, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे सामाजिक बदल घडून आले. त्यांचे विचार आजही भारतीय आणि सामाजिक जीवनासाठी प्रेरणास्थान आहेत. करिता, प्रस्तुत संशोधन विषयाची निवड करण्यात आली आहे.