बीड जिल्ह्यातील कुटुंबाचा आरोग्यावरील खर्च प्रवृत्तीचा चिकीत्सक अभ्यास

Authors

  • डॉ. सुनिल अंबऋषी गोंड Author

Keywords:

आरोग्य, वार्षिक उत्पन्न, वार्षिक खर्च, कर्ज इत्यादी

Abstract

विकासाच्या दृष्टिकोनातून मनुष्य बळाचा विचार करताना लोकसंख्येच्या संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढ विचारात घेणे जास्त आवश्यक असते. कारण राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत लोकसंख्येच्या संख्यात्मक स्थितीपेक्षा गुणात्मक स्थितीचे प्रतिबिंब उमटत असते. लोकसंख्येची संख्यात्मक व गुणात्मक स्वरूपाची संसाधन स्थिती व आर्थिक विकास यांचा परस्पर संबंध मानवी विकास विवेचनाच्या दृष्टिकोनातून विचारात घेणे आवश्यक आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ हा आवश्यक आणि मुलभूत असा घटक आहे. मनुष्यबळाची उत्पादकता, कुशलता, संशोधकता आणि गतिमानता यासंबंधीची क्षमता कायम राखण्यासाठी व वाढविण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, मनोरंजन आणि समान संधी या विकासाच्या संकल्पनेतील अंगभूत बाबींची पूर्णत: व नेहमीची तरतूद असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आरोग्य हा सद्य स्थितीमध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेला दिसून येतो. आरोग्य हीच संपत्ती या उक्तीप्रमाणे ज्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम असते तो व्यक्ती स्वतःच्या आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो. प्रस्तुत शोध निबंधामध्ये बीड जिल्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न, वार्षिक खर्च, आजारावरील खर्च, कर्ज, कर्जाची परतफेड इत्यादी गोष्टींचा अभ्यास करण्यात आलेला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. सुनिल अंबऋषी गोंड

    सहाय्यक प्राध्यापक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा

Published

2025-12-20

How to Cite

बीड जिल्ह्यातील कुटुंबाचा आरोग्यावरील खर्च प्रवृत्तीचा चिकीत्सक अभ्यास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 1048-1058. https://iipublications.com/iipwjhss/article/view/993

Similar Articles

31-40 of 231

You may also start an advanced similarity search for this article.