भटक्या विमुक्त समाजाच्या सक्षमिकरणात वाखरी आश्रमशाळेचे योगदान

लेखक

  • प्रा.डॉ.भारती कुमार सुडके ##default.groups.name.author##

##semicolon##

आश्रमशाळा

सार

"चालला चालला लामाणांचा तांडा या गावाहून दुजा गावा" या ओवी प्रमाणे महाराष्ट्राच्या खेडोपाडी रानावनात भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक पोटासाठी भटकत असल्याचे दिसते. त्यांचे संपूर्ण आयुष्य पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करण्यातच संपून जाते. भटक्या विमुक्त जातीजमातीतील लहान मुले ही आपल्या कुटुंबाबरोबर या गावाहून त्या गावाला भटकत असतात. या लोकांच्या झोपडीच्या आसपासही शिक्षणाच्या सूर्याची किरणे पोहोचलेली नसतात. पारंपारिक व्यवसाय, अवगत कला, रुढी, परंपरा, देवदेवतावरील श्रध्दा, अंधश्रध्दा, दैववादीपणा, गावोगाव, रानोमाळ भटकंती हेच आपले जीवन मानणाऱ्या भटक्या विमुक्त समाजातील लोक स्वतःच्या सर्वांगीण विकासापासून कोसोमैल दूर राहिली. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात सरकारकडून शिक्षणाच्या सार्वत्रीकरणावर भर देण्यात आला. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात समावून घेण्यासाठी विविध शैक्षणिक आयोग नेमून सुधारणात्मक शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली याचे फलीत म्हणजे आदिवासी अनुसुचित जातीजमाती व भटक्या विमुक्त जातीजमातीतील मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांची निर्मिती करून सरकारकडून निवासी मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली. पंढरपूर शहरपासून नजिकच साधुसंत व वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाखरी या गावात समाजातील अनुसुचित व भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुलामुलींना शिक्षण देणारी लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • प्रा.डॉ.भारती कुमार सुडके

    सहाय्यक प्राध्यापक {इतिहास विभाग } कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जि. सोलापूर.

प्रकाशित

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##