धार्मिक एकात्मतेचे ठिकाण : पीर संभुआप्पा-बुवाफन मठ

##article.authors##

  • प्रा. डॉ. रामचंद्र गुर्लिंग घुले ##default.groups.name.author##

##semicolon##

उरूण-इस्लामपूर मठ हिंदू-मुस्लिम

##article.abstract##

हा शोधनिबंध सांगली जिल्ह्यातील उरूण-इस्लामपूर शहरात (वाळवा तालुका) असलेल्या पीर संभुआप्पा-बुवाफन मठाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व स्पष्ट करतो. हे शहर कृष्णा आणि वारणा नद्यांच्या दुआबात वसलेले असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श नमुना आहे. हा मठ हिंदू-मुस्लिम धर्मियांचे पवित्र श्रद्धास्थान असून शांतता, बंधुता आणि समतेचा मार्ग दर्शवतो. बुवाफन हे मुस्लिम सुफी संत होते, तर संभुआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील असून त्यांनी बुवाफनांना गुरु मानले. या दोघांनी वारकरी संप्रदायाप्रमाणे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माचे पालन केले. या मठात संभुआप्पांनी शके १६६३ मध्ये जिवंत समाधी घेतली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्तिक पौर्णिमेला 'उरूस' भरविण्याची प्रथा आहे, जी सुमारे पंधरा दिवस चालते. या उरुसामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येतात, 'फकीर' होतात आणि 'संभुआप्पा-बुवाफन दस्तूर धीन...' असा गजर करून हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचा संदेश देतात. या परंपरेने जातीयता, अस्पृश्यता आणि विषमतेवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. मठाची वास्तूरचना इस्लामी शैलीची असून येथे हिंदूंच्या खंडोबाच्या स्थानाप्रमाणे भंडाऱ्याचा सडा पडतो. उरूण-इस्लामपूर शहरात पीर मोहब्बत सुलेमान, राजे बागेस्वार पीर, हजरत पीर चांद बुखरी यांसारखे अनेक दर्गे आणि पीर आढळतात, जे गंगा-जमनी तहजीबची साक्ष देतात.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiography##

  • प्रा. डॉ. रामचंद्र गुर्लिंग घुले

    सहयोगी प्राध्यापक (इतिहास) मा. व. पा. कन्या महाविद्यालय, इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली

##submissions.published##

2025-12-20

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##