जागतिक राजकारणातील भारताचे स्थान
Keywords:
सॉफ्ट पॉवर नैतिक प्रभाव विचारधाराAbstract
जागतिक राजकारण हे अखंडपणे चालणारे असते. यामध्ये चढ-उतार, बदल व अनपेक्षित घटना-प्रसंग समाविष्ट असतात. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारण हे अधिक प्रकाशझोतात येऊ लागले. एकध्रुवीय, द्विध्रुवीय व बहुध्रुवीय अशी जागतिक राजकारणाची स्थित्यंतरे आपल्याला दिसतात. सामान्यत: विश्व स्तरावर जे राजकारण होत असते, त्यामध्ये जे राष्ट्र अधिक सामर्थ्यशाली असेल त्याचे उपद्रवमूल्यही अधिक असते. गरीब, अविकसित, विकसनशील व विकसित अशी सर्व राष्ट्रे सहभागातून हे जागतिक राजकारण आकारास येत असते, घडत असते. यामध्ये नेतृत्व, विचारधारा, संस्था-संघटना, राजनय, तिसरे पक्ष, दबाव गट-समूह, प्रभावशाली व्यक्ती ही आपली भूमिका पार पाडत असतात, स्थान निर्माण करत असतात. राष्ट्र-राज्य, संविधान, सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकता, समान हितसंबंध, संघराज्य या संकल्पना 18 व्या शतकानंतर रूजू लागल्या, वसाहतवाद-साम्राज्यवादाचा शेवट होऊ लागला. प्रस्तुत शोधनिबंध स्वातंत्र्योत्तर (आधुनिक) भारताचे स्थान, महत्त्व, प्रभव स्पष्ट करणारा आहे.
Downloads
References
1)जागतिक राजकारण, अंजली रानडे, डायमंड प्रकाशन 2)असा घडला भारत, रोहन प्रकाशन 3)आंतरराष्ट्रीय राजकारण, बी.डी. तोडकर, प्रशांत प्रकाशन